आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या कारकिर्दीत केवळ ५०-१०० नव्हे तर १८० सुपरफ्लॉप सिनेमे दिले आहेत.
(1 / 7)
बॉलिवूड कलाकार त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट करतात. त्यामधील काही हिट तर काही फ्लॉप ठरतात. आता आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या करिअरमध्ये १८० फ्लॉप सिनेमे दिले आहेत.(instagram)
(2 / 7)
या अभिनेत्याचे नाव मिथुन चक्रवर्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहेत. 1976 मध्ये मृगया या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. या चित्रपटासाठी मिथुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.(instagram)
(3 / 7)
मिथुन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का त्यांनी अनेक फ्लॉप सिनेमे देखील गिले आहेत.(instagram)
(4 / 7)
रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांनी आपल्या करिअरमध्ये १८० चित्रपट फ्लॉप दिले आहेत. त्यापैकी १३३ फ्लॉप आणि ४७ सुपर फ्लॉप ठरले आहेत.(instagram)
(5 / 7)
एवढेच नाही तर वर्ष २००० च्या सुरुवातीला मिथुन यांनी सलग ३३ फ्लॉप चित्रपट दिले होते. मिथुन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी ३७० चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी २०० चित्रपट मी अजून पाहिलेले नाहीत.(instagram)
(6 / 7)
आता तुम्ही विचार करत असाल की इतके चित्रपट फ्लॉप होऊनही मिथुन यांनी चांगली कमाई कशी केली आहे? जरी फ्लॉप सिनेमे दिले असले तरी हिट सिनेमे देखील दिले आहेत. काही सिनेमांनी तर १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.(instagram)
(7 / 7)
मिथुन यांच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असत. त्यांचा विवाह हेलेना ल्यूकशी झाला होता. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले.(instagram)