आयएनएस इंफाळ ही प्रोजेक्ट 15B स्टेल्थ गाईडेड मिसाईलद्वारे सज्ज युद्धनौका आज, २६ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. नौदलात दाखल चार स्वदेशी 'विशाखापट्टणम' श्रेणीतील विनाशिकांपैकी तिसरी विनाशिका भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने डिझाइन केली असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई यांनी ती तयार केली आहे. यावेळी मुंबईतील नौदल गोदीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
(PTI)‘आयएनएस इंफाळ’ या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि वजन ७४०० टन एवढे आहे. भारतात निर्मित सर्वात मजबूत अशा युद्धनौकांपैकी ही एक आहे. या युद्धनौकेला गॅस पुरवठा करण्यासाठी चार शक्तिशाली असे गॅस टर्बाइन्स यात आहे. ही युद्धनौका प्रती तास ३० नॉटिकल मैल (५६ किलोमीटर) वेगाने समुद्रात प्रवास करू शकते. या युद्धनौकेत एकूण ३१५ कर्मचारी आहेत.
(REUTERS)मुंबई स्थित माझगाव डॉक लिमिटेडने बांधलेल्या या जहाजात सुमारे ७५ टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी स्वदेशी रॉकेट लाँचर्स आणि ७६ मिमी सुपर रॅपिड गन सारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा या युद्धनौकेवरून करता येणार आहे.
(PTI)ईशान्य भारतातील इंफाळ या शहराच्या नावाने नामकरण करण्यात आलेली 'आयएनएस इंफाळ' ही पहिलीच युद्धनौका आहे. देशाच्या आणि भारतीय नौदलासाठी ईशान्येकडील राज्यांचे आणि मणिपूरचे असलेले महत्त्व आणि योगदान याद्वारे अधोरेखित झाले आहे. एकप्रकारे हा अनोखा गौरव या युद्धनौकेला प्राप्त झाला आहे.
(All India Radio News X)