Miss World 2024 : जगातील ११२ देशांतील स्पर्धकांचा सहभाग असलेला मिस वर्ल्ड (Miss World)स्पर्धा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली. या वर्षीचा सौन्दर्यवतीचा खिताब हा झेक प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व करणारी क्रिस्टिना पिस्झकोव्हाने ताज जिंकला. पाहुयात या सोहळ्याचे काही क्षणचित्र.
(1 / 7)
चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने शनिवारी आयोजित एका भव्य कार्यक्रमात प्रतिष्ठित मिस वर्ल्ड २०२४ चा मुकुट मिळवला. (Instagram/@missworld)
(2 / 7)
मिस लेबनॉन यास्मिना झायटौनला ही या स्पर्धेची प्रथम उपविजेती ठरली.
(3 / 7)
२८ वर्षानंतर या कार्यक्रमाचे आयोजन भारतात करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व २२ वर्षीय सिनी शेट्टीने केले होते. (ANI)
(4 / 7)
रीटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय बच्चन (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा जोनास (२०००), आणि मनूश्री छिल्लर (२०१७) सह भारताने सहा वेळा प्रतिष्ठित विजेतेपद मिळवले आहे. (Instagram)
(5 / 7)
चित्रपट निर्माता करण जोहर आणि माजी मिस वर्ल्ड मेगन यंग यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.(ANI)
(6 / 7)
संजय लीला भन्साळी यांच्या डेब्यू वेब सीरिज, हीरामंडी: द डायमंड बझारचे कलाकार, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सेगल आणि संजीदा शेख यांच्यासह, १३ फास्ट-ट्रॅक मिस वर्ल्ड स्पर्धकांसाठी मंचावर सामील झाले. (PTI)
(7 / 7)
मिस वर्ल्ड २०२४ मध्ये गायक शान, नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी सादरीकरण केले.