MG Comet EV : एका पिझ्झाच्या किंमतीत महिनाभर पळवा गाडी! जाणून घ्या अत्याधुनिक फिचर्स व किंमत
MG Comet EV Electric car : MG Motors ने मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय कार बाजारात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार MG Comet EV च्या रुपात लाँच केली आहे. जाणून घ्या या कारची अत्याधुनिक फिचर्स अन् किंमत
(1 / 5)
आधुनिक तंत्रज्ञान आणि चांगल्या ड्रायव्हिंग रेंजने परिपूर्ण ही कार भारतीय बाजारात Tata Tiago Ev या कारला जबरदस्त टक्कर देईल, असे मानले जात आहे.
(2 / 5)
आकर्षक लूक, बॉक्सी डिझाईन असणाऱ्या या मिनी इलेक्ट्रीक कारची सुरुवातीची किंमत ७.९८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने या कारची किंमत टाटा टियागो या कारहून कमी ठेवली आहे. टाटाच्या कारची किंमत ८.६९ लाख रुपये आहे.
(3 / 5)
कंपनीने दावा केला आहे की, या गाडीला संपूर्ण महिन्याच्या चार्जिंगला केवळ ५१९ रुपये खर्च येईल. जो एका पिझ्झाच्या किंमतीच्या बरोबर आहे. म्हणजे एका पिझ्झाच्या किंमतीत तुम्ही महिनाभर गाडी पळवू शकता. कंपनीने कॉस्ट १,००० किलोमीटर अंतर लक्षात घेऊन निश्चित केली आहे. ही कार जिडिटल key च्या माध्यमातूनही ऑपरेट केली जाऊ शकते.
(4 / 5)
दोन दरवाजे व चार सीट असणारी ही इलेक्ट्रिक कार कंपनीने नुकतीच लाँच केली आहे. एमजी कंपनीकडून भारतीय बाजारात सादर करण्यात आलेली ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. यापूर्वी MG eZS ही कार लाँच करण्यात आली होती.
(5 / 5)
कंपनी या कारसाठी बुकिंग १५ मे २०२३ पासून सुरू करणार असून या कारचे टेस्ट ड्राइव्ह आजपासून (२७ एप्रिल) सुरू होईल. बुकिंगसोबत या गाडीची डिलिव्हरीही मे महिन्यापासून सुरू होईल.
इतर गॅलरीज