गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एकीकडे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरच्या समस्या आहेत, तर दुसरीकडे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर, फुप्फुसाच्या कॅन्सरच्या समस्या दिसून येतात. जाणून घ्या अशी नियम, जी पाळल्याने पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका कमी होईल.
खाण्या-पिण्याच्या सवयी: पुरुषांना कामामुळे बहुतेक वेळा घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे पुरुष प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा साखरयुक्त पेये जास्त प्रमाणात घेतात. या सर्व पदार्थांऐवजी संतुलित आहार घेतला पाहिजे. तर कॅन्सरचा धोका खूप कमी होऊ शकतो.
वजन नियंत्रित ठेवणे: वयानुसार वजन वाढणे ही जवळजवळ प्रत्येक पुरुषाची सामान्य समस्या आहे. जर तुमचं वजन जास्त वाढलं तर कॅन्सर होण्याचा धोका असतो, त्यामुळे दिवसभरात काही वेळ व्यायाम करून आपलं वजन नियंत्रित करावं लागतं.
अल्कोहोल: पुरुषांमध्ये मद्यपान करणे खूप सामान्य आहे. कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर आधी दारूपासून दूर राहावे लागेल.
तंबाखूचे सेवन: जास्त धूम्रपान केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या तंबाखूजन्य पदार्थापासून स्वत:ला दूर ठेवता आले नाही तर केव्हाही कॅन्सर होण्याचा धोका असतो.
विश्रांती: दिवसभरात किमान आठ तास विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभर काम केल्यानंतर नीट विश्रांती घेतली नाही तर कॅन्सर होण्याचा धोका असतो.