यंदा मौनी अमावस्या २९ जानेवारी, बुधवारी आहे. माघ महिन्याच्या अमावस्येला मौनी किंवा पौष अमावस्या म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा मौनी अमावास्येला अनेक वर्षांनंतर त्रिवेणी योगाचा अद्भुत योगायोग घडणार आहे.
ज्योतिषीय गणनेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि बुध मिळून मकर राशीत त्रिग्रही आणि त्रिवेणी योग तयार करतील. तसेच गुरू देखील वृषभ राशीत स्थित असेल. ज्यामुळे या योगायोगाचा परिणाम महाकुंभावरही होणार आहे. मौनी अमावस्येला होणारी ही योगायोग घटना काही राशींसाठी लाभदायक असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याविषयी जाणून घेऊया.
वृषभ :
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मौनी अमावस्या शुभ ठरणार आहे. या दिवशी तयार झालेल्या त्रिवेणी योगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. यासोबतच तणावापासून मुक्ती मिळेल. तसेच आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
कर्क :
मौनी अमावस्येला होणारा विलक्षण योगायोग कर्क राशीच्या व्यक्तींसाठीही खास असेल. या राशीचे लोक काही नवीन कामाची सुरुवात करू शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आपण आपले उत्पन्न वाढवू शकाल.
कन्या :
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मौनी अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. नोकरीत प्रभाव वाढेल. त्रिवेणी योगाच्या शुभ प्रभावामुळे न सुटलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. मालमत्तेतून फायदा होईल. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मदत मिळेल.
तूळ :
मौनी अमावस्येपासून तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात विशेष बदल घडतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही परदेशात प्रवास करू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळेल. व्यवसायाची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. यश मिळू शकते. गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगली कमाई करणे शक्य आहे. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मकर :
मकर राशीच्या लोकांना मौनी अमावास्येला सौभाग्य प्राप्त होईल. विवाहितांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक प्रवासाची शक्यता राहील. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. जमिनीशी संबंधित नोकरी करणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होऊ शकतो.