Amavasya February 2024 : वर्ष २०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यातील अमावस्या तिथी कोणत्या तारखेला आहे? तसेच या दिवशी काय काय केल्याने पुण्य व लाभ होईल जाणून घ्या.
(1 / 4)
मौनी अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी उपवास आणि पवित्र नदीत स्नान करणे महत्वाचे आहे. मौनी अमावस्येला मौनी व्रत पाळले जाते. २०२४ मध्ये, पौष महिन्याची मौनी अमावस्या ९ फेब्रुवारी रोजी असून, या तिथीला दर्श, मौनी अमावस्या म्हणतात.
(2 / 4)
मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी दान केल्यास १६ पट अधिक फळ मिळते.
(3 / 4)
पौष दर्श अमावस्येच्या दिवशी वस्त्र, ब्लँकेट, अन्न, तूप, गूळ, काळे तीळ, सोने, गाय इत्यादींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
(4 / 4)
या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करावे, नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करायला विसरू नका.
(5 / 4)
या दिवशी मुंग्याना पिठ किंवा पिठाचे छोटे गोळे बनवून खायला द्यावे. पिठात साखर घालून मुंग्यांना खायला द्यावे. तसेच या दिवशी गायीला तिळाचे पीठ किंवा मैदा मिसळून भाकरी खाऊ घालावी. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)