प्रेग्नंट महिलांसाठी मॅटर्निटी हेल्थ हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करू नका. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा तिचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते.
(Dominika Roseclay)गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या काही सर्वात सामान्य समस्या म्हणजे गर्भधारणेचा मधुमेह, गर्भधारणेचा उच्च रक्तदाब, चिंता, नैराश्य, मूळव्याध, थायरॉईड, कुपोषण, एनिमिया, इंफेक्शन, प्लेसेंटल अडथळे किंवा गर्भाच्या समस्या अशा काही गुंतागुंत निर्माण होऊ शकता. ज्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही इजा होऊ शकते. बाळाचा जन्म निरोगी होणे फार महत्वाचे असते. गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या काळजीमध्ये गर्भधारणेच्या काळजीचा समावेश असावा.
(cottonbro)संतुलित आहार घ्याः गर्भवती महिलांसाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. बाळाला वाढ आणि विकासासाठी सर्व आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. भरपूर ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कॅल्शियम असलेले पदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असलेले पदार्थ खा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच प्रसवपूर्व जीवनसत्त्वे (फॉलिक अॅसिड, लोह आणि कॅल्शियम) सारखी सप्लिमेंट्स घ्या. जंक, फॅट, तेल आणि प्रोसेस्ड फूड यांचा वापर मर्यादित करा. पुरेसे पाणी प्या. धूम्रपान किंवा मद्यपान टाळा.
(Unsplash)प्रेग्नंसी डिप्रेशन आणि प्रेग्नंसी नंतरचे डिप्रेशन यासारखी चिन्हे समजून घ्या. तसेच स्तनपान का फायदेशीर आहे, अशा विषयांवर समुपदेशन घ्या.
(StockPic)नियमित प्रसवपूर्व तपासणीसाठी जा - ज्या महिलांना नियमित प्रसवपूर्व केअर मिळत नाही त्यांना कमी वजनाचे बाळ किंवा इतर समस्या दिसू शकतात. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले फॉलोअप चुकवू नका. सहज गर्भधारणा होण्यासाठी चांगली झोप घ्या. तणावमुक्त राहा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फ्लू शॉट घ्या. फ्लू शॉट घेतल्याने मातांना गंभीर आजारापासून वाचवता येते.
(Shutterstock)