IND vs NZ 2023 : विराट कोहलीने आक्षेप घेताच अंपायर्सनी काही वेळ सामना थांबवला होता. त्यानंतर काही वेळाने मॅच सुरू करण्यात आली.
(1 / 6)
India vs New Zealand ICC World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सलग चार सामने जिंकणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या संघात धर्मशाळेत रंगतदार सामना सुरू आहे.(PTI)
(2 / 6)
IND vs NZ 2023 : न्यूझीलंडने टीम इंडियासमोर २७४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात भारताने पाच गडी गमावत २४० धावा केल्या आहे. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा क्रीझवर आहेत.(PTI)
(3 / 6)
IND vs NZ ICC World Cup 2023 : दुसऱ्या डावात भारताच्या १०० धावा झालेल्या असताना सामना अचानक काही वेळ थांबवण्यात आला होता. विराट कोहलीने अंपायर्सना विनंती केल्यानंतर मॅच थांबली होती.(PTI)
(4 / 6)
लाईट सुरू असताना देखील अंधुक प्रकाशामुळं फलंदाजांना चेंडू दिसत नसल्याचं विराट कोहलीने अंपायर्सच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर काही वेळ सामना थांबवण्यात आला.(PTI)
(5 / 6)
अंधुक प्रकाश आणि धुकं कमी झाल्यानंतर पुन्हा सामना सुरू करण्यात आला. त्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम यांनी देखील चर्चा केली.(AP)
(6 / 6)
अंपायर्सनी देखील दोन्ही संघातील कर्णधार आणि अन्य खेळाडूंशी चर्चा केली. धुकं गेल्यानंतर सामना सुरू झाला आहे. भारताला विजयासाठी ४२ चेंडूत ३१ धावांची आवश्यकता आहे. विराट कोहली आणि जडेजा क्रीझवर असल्याने सामन्यात रंगत आलेली आहे.(AP)