Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे. परिणामी राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहे.
(HT Marathi)Maratha Reservation Protest : गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलेलं आहे. बीड, सोलापूर, धाराशीव आणि पुण्यातही आंदोलक हिंसक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
(HT Marathi)Maratha Reservation Protest In Pune : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी नवले ब्रीजवर जाळपोळ केली आहे. परिणामी पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.
(Hindustan Times Marathi)Maratha Reservation : नवले पुल आणि परिसरातील अनेक मार्ग आंदोलकांनी बंद पाडले. त्यामुळं पुणे-सातारा मार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला आहे.
(HT Marathi)नवले ब्रीजवर जाळपोळ झाल्याची माहिती समजताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याची माहिती आहे.
(HT Marathi)