mumbai pune expressway landslide : पुणे-मुंबई महामार्गावर दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळं काही तास महामार्गावरील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली होती.
(1 / 5)
landslide on mumbai pune expressway today : मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा आणि लोणावळा जवळ दरडी कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहे. सोमवारी मध्यरात्री या दरडी कोसळल्या आहे. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली.(HT)
(2 / 5)
landslide on mumbai pune expressway : दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.(HT)
(3 / 5)
अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी दोन तास महामार्ग संपूर्णपणे बंद ठेवून दरडी हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं.(HT)
(4 / 5)
सुदैवाने दोन ठिकाणी घडलेल्या या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. तसेच कोणत्याही वाहनांचं या घटनेत नुकसान झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(HT)
(5 / 5)
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने शेकडो वाहनं जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वळविण्यात आली. दरडी हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत केली जाणार असल्याची माहिती आहे.(HT)