Masik Durga Ashtami June 2024 : या महिन्यात मासिक दुर्गा अष्टमी १४ जून रोजी साजरी केली जाईल. या दिवशी देवी दुर्गाची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होते. शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी दुर्गा अष्टमी साजरी केली जाते. जाणून घ्या या दिवशी कोणत्या खास गोष्टी करता येतील.
(1 / 8)
हिंदू धर्मात दुर्गामातेच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवीची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतातच तसेच यामुळे अनेक समस्याही दूर होतात. त्याचबरोबर मासिक दुर्गाष्टमीला देवीची पूजा केल्यास रोग आणि भीतीपासून मुक्ती मिळू शकते.
(2 / 8)
हिंदू दिनदर्शिकेनुसार, मासिक दुर्गा अष्टमी प्रत्येक महिन्यातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास केल्यास शुभ फळ आणि दुर्गा मातेची कृपा प्राप्त होते. या महिन्यात दुर्गा अष्टमीचे व्रत १४ जून रोजी आहे.
(3 / 8)
दुर्गा अष्टमी १३ जून रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी सुरू होऊन १४ जून रोजी रात्री १० वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील. उदयातिथी लक्षात घेऊन दुर्गाष्टमीचे व्रत १४ जूनलाच केले जाणार आहे.
(4 / 8)
यादिवशी सकाळी उठून ब्रम्ह मुहूर्तावर आंघोळ करावी आणि दैनंदिन दिनचर्या झाल्यानंतर घरातील मंदिराची साफसफाई आणि मनोभावे पूजा करावी.
(5 / 8)
चौरंगावर लाल कापड पसरवून त्यावर दुर्गामातेचे चित्र किंवा मूर्ती ठेवून सौभाग्याच्या गोष्टी देवीला अर्पण कराव्या आणि लाल वस्त्र तसेच लाल फुले दुर्गामातेला अर्पण करावीत.
(6 / 8)
यानंतर देवीचे नामस्मरण करून तसेच मंत्रोच्चार करून मातेची पूजा आणि आरती करा. आरतीनंतर नैवेद्य अर्पण करून प्रसादाचे वाटप करा.
(7 / 8)
दुर्गाष्टमीला दुर्गामातेला खीर अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यासोबत पंचामृत आणि साखर अर्पण करता येते. या वस्तू अर्पण केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि त्यांची आपल्या भक्तांवर नेहमी कृपा राहते.
(8 / 8)
पूजेदरम्यान दुर्गा मातेला केळी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते, यामुळे करिअरच्या समस्या दूर होतात आणि यश मिळते.(Freepik)
(9 / 8)
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही दुधापासून बनवलेली मिठाई किंवा रसमलाई देखील अर्पण करू शकतात. तसेच हा प्रसाद गोरगरीबांना किंवा गरजूंना देखील देऊ शकतात. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.(Pinterest)