(1 / 5)मंगळाचे संक्रमण : नऊ ग्रह आपआपल्या कालगणेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. याला ज्योतिषशास्त्रात 'राशींचे संक्रमण' म्हणतात. ग्रहांचा उदय होणे, वक्री होणे आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होणे यामुळे राशीचक्रातील काही राशींना चढ-उतारास सामोरे जावे लागते. काही राशींवर चांगले तर काही राशींवर वाईट परिणाम होतो. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा अधिपती आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला ४५ दिवस लागतात.