ओटीटी क्षेत्रात आज, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांसोबत, लोकांना के-ड्रामा अर्थात कोरियन शो देखील खूप आवडत आहेत. रोमँटिक, क्राईम, हॉरर, सर्व प्रकारच्या जॉनरचे शो वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशा कोरियन शोबद्दल सांगणार आहोत, जे नोव्हेंबरमध्ये रिलीज होण्यास सज्ज झाले आहेत.
ब्रुईंग लव्ह : हा रोम-कॉम ड्रामा एका मद्य कंपनीचा सीईओ आणि सेल्सवुमन यांच्यातील रंजक नाते संबंधांवर आधारित आहे. ही सीरिज आज विकी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
गंगनम बी-साइड : ही एक क्राईम थ्रिलर कथा आहे. एका गँगस्टरच्या दुनियेतील वास्तव या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. जेव्हा स्वतःच्या मुलीचा मित्र बेपत्ता होतो, तेव्हा गुप्तहेर त्याच्या जुन्या आयुष्यात परततो. ही क्राइम सीरिज जसजशी पुढे जाईल, तसतशी आणखी अनेक गुपिते उलगडली जाणार आहेत. ६ नोव्हेंबर रोजी ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
मिस्टर प्लँकटन : हा के ड्रामा अशा दोन अनोळखी लोकांच्या आयुष्यावर आधारित आहे, जे त्यांच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. एका दुर्दैवी माणसाला त्याच्या मैत्रिणीसोबत शेवटच्या प्रवासात कसा वेळ घालवायला मिळती, ते यात दाखवले आहे. ही सीरिज ८ नोव्हेंबर रोजी ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होणार आहे.
द फायरी प्रिस्ट २ : 'द फायरी प्रिस्ट २' हा २०१९च्या हिट के-ड्रामाचा सिक्वेल आहे. त्याची कथा बुसानच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. ही वेब सीरिज ८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
मॅरी यु : हा ड्रामाची कथा एका बेटावर राहणारा सरकारी कर्मचारी आणि बॅचलर यांच्यात झालेल्या विवाहावर आधारित आहे. ही सीरिज ५ नोव्हेंबर रोजी ‘चॅनल ए’वर पाहायला मिळणार आहे.
पॅरोल एग्जामिनर ली : हा शो एका पॅरोल अधिकाऱ्याभोवती फिरतो, जो लोकांना अवैध मार्गाने पॅरोल मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. १८ नोव्हेंबर रोजी ही सीरिज ‘टीव्ही एन’वर रिलीज होणार आहे.
वेन द फोन रिंग्स : या के-ड्रामाची कथा एका दु:खी विवाहित जोडप्याची कहाणी सांगते, ज्यांचे आयुष्य बदलून जाते जेव्हा त्यातील पत्नीचे अपहरण होते. ही सीरिज २२ नोव्हेंबर नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
लव युअर एनेमी : ही सीरिज कौटुंबिक वादामुळे आपल्या खऱ्या भावना लपवणाऱ्या दोन व्यक्तींची कथा सांगणारी आहे. २३ नोव्हेंबरला रिलीज होणारी ही सीरिज विकीवर पाहता येईल.