Marathi Ukhane: उखाणे ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धत आहे. आज आपण नव्या नवरीसाठी काही खास उखाणे पाहणार आहोत.
(1 / 8)
मराठी संस्कृतीमध्ये लग्नानंतर नव्या नवरीला आणि नवऱ्याला उखाणे घ्यावे लागतात. उखाणे ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धत आहे. आज आपण नव्या नवरीसाठी काही खास उखाणे पाहणार आहोत. (freepik)
(2 / 8)
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,.... रावांचे नाव घेते...ची सून.(freepik)
(3 / 8)
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,...रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
(4 / 8)
आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,..... रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
(5 / 8)
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,.... रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
(6 / 8)
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,.... रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
(7 / 8)
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,...च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
(8 / 8)
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा,शोधून नाही सापडणार, ....सारखा हिरा.
(9 / 8)
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,.... रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.