मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Marathi Serial TRP: सायली ते स्वरा...टीआरपीच्या शर्यतीत कुणी मारली बाजी? पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मालिका

Marathi Serial TRP: सायली ते स्वरा...टीआरपीच्या शर्यतीत कुणी मारली बाजी? पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मालिका

Feb 17, 2024 06:14 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Marathi Serial TRP List Week 6: प्रेक्षकांच्या काही आवडत्या मालिकांनी मात्र टीआरपी शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. चला तर बघूया या सहाव्या आठवड्यात कोणत्या मालिकांनी बाजी मारली आहे...

मराठी मनोरंजन विश्वात सध्या नव्या मालिकांची धूम पाहायला मिळत आहे. या दरम्यान प्रेक्षकांच्या काही आवडत्या मालिकांनी मात्र टीआरपी शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. चला तर बघूया या सहाव्या आठवड्यात कोणत्या मालिकांनी बाजी मारली आहे…
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

‘ठरलं तर मग’ ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर टिकून आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन यांच्यातील भावनिक बंध पाहायला मिळत आहेत. सायली आणि अर्जुन यांच्या हनिमून ट्रॅकने प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवले होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत देखील आठवड्यात अनेक नवे ट्वीस्ट पाहायला मिळाले आहेत. अद्वैत आणि कला यांच्या लग्नामुळे आता या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या लग्नामुळे मालिकेच्या कथानकात हल्लाकल्लोळ पाहायला मिळणार आहे. ही मालिका सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

सागर आणि मुक्ताची कहाणी सांगणारी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपी शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. सागर आणि मुक्ता यांची वाढणारी जवळीक मालिकेच्या कथानकाला रंगत आणत आहे. मुक्ता आणि सईसाठी सागरने गुंडाशी हाणामारी देखील केली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत चौथे स्थान पटकावले आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागांनी प्रेक्षकांना मालिकेच्या कथानकात गुंतवून ठेवले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या कथानकात आता पुन्हा एकदा गौरी आणि जयदीप यांना त्यांचा पुनर्जन्म आठवू लागला आहे. तर, या जन्मात आता ते पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या आठवड्यात ‘सुखं म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या कथानकात आता पुन्हा एकदा गौरी आणि जयदीप यांना त्यांचा पुनर्जन्म आठवू लागला आहे. तर, या जन्मात आता ते पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या आठवड्यात ‘सुखं म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज