(2 / 5)अनेक कलाकारांनी ‘ऑल द बेस्ट’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर हे सुपरस्टार झाले. या नाटकाने मराठीत अत्यंत कमी वर्षात ४५०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही, तर विविध भाषिक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालं असून, त्याचे जवळ जवळ १०००० प्रयोग होत आले आहेत.