मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जाड आणि बारीक याच्यापलीकडे काही दिसत नाही का?; बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर चिडली मराठी अभिनेत्री

जाड आणि बारीक याच्यापलीकडे काही दिसत नाही का?; बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर चिडली मराठी अभिनेत्री

Apr 01, 2024 12:37 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Marathi Actress Sai Lokur: सई लोकूर देखील सध्या आपल्या लेकीच्या संगोपनात व्यस्त आहे. या दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्या सईला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर काहीच महिन्यांपूर्वी आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई लोकुर आपल्या बाळाची आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याची प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर काहीच महिन्यांपूर्वी आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई लोकुर आपल्या बाळाची आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याची प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.(All Photos: Instagram)

गरोदरपणात आणि आई झाल्यानंतर तिचं वजन काहीसं वाढलेलं आहे. अर्थात प्रत्येक स्त्रीला या शारीरिक बदलाला सामोरे जावेच लागते. सुरुवातीचे सहा महिने ते वर्षभर आपल्या बाळाच्या काळजीपोटी आई आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सई लोकूर देखील सध्या आपल्या लेकीच्या संगोपनात व्यस्त आहे. या दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्या सईला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काही लोक तिला ‘तू जाडी झाली आहे’, ‘जाडी दिसतेयस’, ‘जाडू बाई’ असं म्हणून सतत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यावरच आता सई लोकूर उत्तर दिले आहे. ‘लोकांना जाड बारीक या पलीकडे काही दिसत नाही का?’, असा प्रश्न तिने आपल्या पोस्ट मधून विचारला आहे. तर, ‘एखादी स्त्री मातृत्वानंतर किमान सहा महिन्याच्या सुट्टीवर जाते.  आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी ही सुट्टी गरजेची असते. मी मात्र बाळाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच काम करण्यास सुरुवात केली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

‘माझ्याकडे असलेल्या जाहिराती आणि इतर गोष्टींचा शूटिंगसाठी मी यातून वेळ काढला. या गोष्टीचा कौतुक न करता लोकं मला जाडी बोलून ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. आपण अशा समाजात राहतो का? जिथे लोकं एकमेकांना प्रोत्साहन द्यायचं सोडून, ते मागे कसे येतील याचा प्रयत्न करतात?’, असा संताप तिने पोस्टमधून व्यक्त केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

‘माझ्याकडे असलेल्या जाहिराती आणि इतर गोष्टींचा शूटिंगसाठी मी यातून वेळ काढला. या गोष्टीचा कौतुक न करता लोकं मला जाडी बोलून ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. आपण अशा समाजात राहतो का? जिथे लोकं एकमेकांना प्रोत्साहन द्यायचं सोडून, ते मागे कसे येतील याचा प्रयत्न करतात?’, असा संताप तिने पोस्टमधून व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज