बहुचर्चित असा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ सध्या धुमधडाक्यात सुरू आहे. १४ मे रोजी सुरू झालेला ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ हा २५ मेपर्यंत सुरु असणार आहे. या फेस्टिव्हलला अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी आतापर्यंत हजेरी लावली. यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा देखील समावेश आहे.
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये कोणते भारतीय कलाकार सहभागी झाले आहेत याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम.
ऐश्वर्या राय, कियारा आडवाणी, उर्वशी रौतेला यांचे कान्समधले लुक तर सोशल मीडिया वर धुमाकूळ घालतच आहेत. पण ‘लापता लेडीज’ या नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील मंजू माई म्हणजेच छाया कदमने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने सोशल मीडियावर ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’मधील फोटो शेअर केले आहेत.
छाया कदमने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये दिवंगत आईची क्रिम कलरची साडी आणि त्यावर वांगी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच आईची नथ तिने नाकात घातली आहे. छायाचा हा मराठमोळा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.