सध्या महाराष्ट्राचे राजकारण आणि लोकसभेची निवडणूक हे अनेकांच्या अस्मितेची लढाई झाली आहे. शरद पवार हे स्वत: यावेळी निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नुकताच शरद पवार यांची बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. हे कळताच मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे.
हेमंतने सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी साहेबांना काळजी घेण्याची विनंती केली आहे.
हेमंतने एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर 'आदरणीय साहेब, आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे. पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणास लवकरात लवकर बरे करो' अशी पोस्ट लिहिली आहे.
बारामतीमध्ये शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी तीन सभा घेतल्या. प्रकृती साथ देत नसतानाही शरद पवारांनी त्यांच्या प्रत्येक उमेदवारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.