Marathi Actors: आस्ताद-स्वप्नाली यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ट्रीपचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
(1 / 5)
मराठी मनोरंजन विश्वातील चर्चित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
(2 / 5)
आता आस्तादने आपली लाडक्या बायकोच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी परदेशी जाऊन स्वप्नालीचा वाढदिवस साजरा केला आहे.
(3 / 5)
अभिनेत्री स्वप्नाली पाटील हिचा २५ मार्च रोजी वाढदिवस झाला. या खास दिवसाचे औचित्य साधत दोघे नवरा-बायको परदेशात फिरायला गेले आहेत. आस्ताद-स्वप्नाली यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ट्रीपचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
(4 / 5)
या फोटोंमध्ये आस्ताद आणि स्वप्नाली पॅरिसमध्ये आयफेल टॉवरखाली सुंदर रोमँटिक अंदाजात फोटोशूट केले आहे. याचेच काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(5 / 5)
आस्ताद आणि स्वप्नाली यांच्या या सुंदर रोमँटिक फोटोंवर आता चाहते आणि सहकलाकार देखील कमेंट करून कौतुक करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.