(6 / 8)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोर्चाच्या स्थळी उपस्थित मराठा जनसमुदायाला संबोधित केलं. ‘मी स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं मराठा समाजाची दु:खं आणि वेदना मला चांगल्या माहीत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द दिला होता. तो मी पूर्ण करत आहे,’ असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असंही त्यांनी सांगितलं.