पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रसिद्धी मिळविलेल्या मनू भाकरने सचिनला भेटल्यानंतर भावना व्यक्त केल्या. मनूने लिहिले की वन अँड ओन्ली सचिन तेंडुलकर सर!
क्रिकेट आयकॉनसोबतचे अनेक फोटो शेअर करताना भाकरने सांगितले की, क्रिकेटच्या आयकॉनसोबत हा खास क्षण शेअर करण्यात तिला धन्यता वाटते. मनू भाकरने पुढे लिहिले की, सचिन तेंडुलकर सरांच्या प्रवासाने मला आणि आपल्यापैकी अनेकांना आमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा दिली. अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद सर!"
सचिन तेंडुलकरसोबतचे मनू भाकरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यावर चाहते कमेंट करत आहेत. मनू भाकरची ही मोठी इच्छा पूर्ण झाली आहे.
सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर मनूची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली. खरे तर मनू भाकरला तिच्या आवडत्या खेळाडूबद्दल विचारले असता तिने उत्स्फूर्त उत्तर दिले, ती म्हणाली की मी अशी अनेक नावे घेऊ शकते. जमैकाचा धावपटू उसेन बोल्टचे पुस्तक मी अनेकदा वाचले आहे आणि त्याचा प्रवास कसा होता याची मला कल्पना आहे. त्याच्या अनेक मुलाखतीही मी पाहिल्या आहेत. आपल्या आवडत्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलताना मनूने सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांचे नाव घेतले होते.
या भेटीदरम्यान, मनू भाकरला सचिनने गणपतीची मूर्ती भेट दिली. विशेष म्हणजे मनूने ५ दिवसांपूर्वीच सचिन, विराट आणि धोनीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता केवळ ५ दिवसांतच तिची क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली.