
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मजोज जरांगे पाटील लाखो मराठा समुदयासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांच्या या मोरचयचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रांजनगव येथील मुक्काम आटोपून जरांगे पाटील हे सकाळी पहाटे ४ वाजता खराडी येथे आले. या ठिकाणी गोठवणाऱ्या थंडीत त्यांनी सभा घेतली. शिक्रापूर कोरेगाव भीमा मार्गावर जमलेला मराठा समुदाय.
जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येत आहे. सकाळी झालेली सभेत देखील वृद्ध महिलासह नागरिक उपस्थित होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जरांगे पाटील दर्शन घेतले.
पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. मुंबईच्या मोर्चाचे ट्रेलर आज पुण्यात पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांचे ठीकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
खराडी येथून सकाळी १० वाजता जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुण्यातील शिक्रापूर येथे लाखो मराठ्यांनी तयांचे जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण रस्ता मराठा आंदोलकांनी गजबजून गेला होता.
पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली तब्बल साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, ५० किलो लसणाची चटणीचे वाटप रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरात वाटण्यात आले.
आज मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा पुणे, शिवाजीनगर मार्गे आज सांगवी फाटा येथे दाखल होईल. तेथून रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी असतील.
तत्पूर्वी सकाळी मनोज जरांगे पाटील यानी खराडी येथे पत्रकरांची संवाद साधला. पाटील म्हणाले, निवडणुक लढवणं हा आपला मार्ग नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हाच आपला, माझा उद्देश आहे. राजकारण म्हटलं की, फोडाफोडीच आलीच, त्यामुळे आपलं समाजकारण सुरू ठेवायचं आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा. शहर असो की ग्रामीण भाग, मराठा समाजातील लेकरांसाठी हा मोर्चा काढला आहे. आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नसून एक दिवसासाठी शहरातून जात आहोत, त्यामुळे तुम्ही एक तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्या कोणी नेत्यांनी विश्वासघात केला आहे. त्या नेत्यांची नावे मुंबईत गेल्यावर जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.





