(2 / 5)एका गावकड़ची गोष्ट असलेल हे गाणं आहे. लहानपणीचं गोड प्रेमाचं नातं अनेक वर्षांनी पुन्हा खुलतंय! गाण्याचा हिरो परदेशातून गावाला परततो, आणि हे नायिकेला कळताच, तिची हूरहूर सुरू होते! आपलं पहिलं वहिलं प्रेम किती वर्षांनी आपल्या समोर येणार आणि तो दिसता क्षणी, ती त्याच्या डोळ्यात हरवून जाते.. पाहतचं राहते त्याच्याकडे... अख्खा गाव स्वागताला गोळा होतो, सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण पसरतं!