ज्योतिषीय गणनेनुसार या काळात मंगळ वक्री असून लवकरच मिथुन राशीत प्रवेश करेल. या वर्षी मंगळावरील हे पहिले मोठे संक्रमण मानले जात आहे. वक्री अवस्थेत मंगळाचा प्रभाव वेगळा असतो. सामान्यत: ग्रहांच्या वक्री गतीचा नकारात्मक प्रभाव पडतो, परंतू काही राशीच्या लोकांना या बदलाचा लाभही मिळतो.
ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, यावेळी मंगळ वक्री स्थितीत आहे आणि २१ जानेवारी २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. या वर्षी मंगळाचे हे पहिले मोठे संक्रमण असल्याचे म्हटले जात आहे. प्रतिगामी अवस्थेत मंगळाचा प्रभाव वेगळा असतो. मंगळाच्या होणारा हा बदल ३ राशीच्या लोकांसाठी खूप खास व फायदेशीर आहे.
वृषभ :
मिथुन राशीतील मंगळाची वक्री अवस्था वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांचे धनाच्या घरात मंगळाचे संक्रमण होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी-व्यवसायात सुधारणा होण्याच्या संधी प्राप्त होतील. अनेक स्त्रोतांकडून पैसा येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि समृद्ध होईल.
तूळ :
तूळ राशीसाठी मंगळाचे संक्रमण नवव्या भावात होईल, जे भाग्याचे घर आहे. अशावेळी नशीब तुम्हाला या काळात पूर्ण साथ देईल, त्यामुळे प्रलंबित कामेही पूर्ण होतील. जीवनाच्या प्रत्येक पैलूत सकारात्मक परिणाम दिसून येतील. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ आणि धैर्य मिळेल. रागावर नियंत्रण राहील.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण अत्यंत शुभ असेल. प्रेम जीवनामधील सर्व समस्या संपुष्टात येतील आणि नातं अधिक घट्ट होईल. जोडीदारासोबतचे संबंध गोड आणि समजूतदार राहतील. आरोग्य चांगले राहील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. नशीब साथ देत असेल तर जीवनाच्या इतर क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण होतील.