मंगळ हा नऊ ग्रहांचा अधिपती आहे. आत्मविश्वास, धाडस, चिकाटी आणि सामर्थ्याचा तो कारक ग्रह आहे. दर ४५ दिवसांनी मंगळ आपली स्थिती बदलतो. मंगळाच्या संक्रमणाचा राशींवर मोठा प्रभाव पडतो.
मंगळाने मिथुन राशीत भ्रमण करायला सुरुवात केली आहे. त्याच्या गोचराचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडेल. मात्र, काही राशींना चांगले परिणाम मिळणार आहेत. पाहूया कोणत्या आहेत या राशी…
मेष : तुमच्या राशीच्या पहिल्या आणि आठव्या भावाचा स्वामी मंगळ आहे. यामुळे तुम्ही जोडीदार आणि कुटुंबियांसोबत आनंदी राहाल. नातेवाईकांकडून होणाऱ्या सर्व समस्या कमी होतील.
वृषभ : मंगळ आपल्या राशीच्या पहिल्या भावात फिरत आहे. यामुळे तुम्हाला राजयोग मिळेल. मंगळाच्या गोचरामुळे वृषभ राशीसाठी जोडीदाराचे प्रेम वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. बेरोजगारांना चांगल्या नोकऱ्या मिळतील. अविवाहितांचे लवकरच लग्न होणार आहे.
कर्क : या राशीच्या अकराव्या भावात मंगळ भ्रमण करत आहे. यामुळे तुमचा आनंद वाढेल. पैशांची अडचण येणार नाही. आर्थिक स्थितीत चांगली प्रगती होईल. नवीन गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगार वाढेल.