मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaysia Open 2024 Final : चिराग-सात्विक जेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंगलं, चीनच्या जोडीकडून थोडक्यात पराभव

Malaysia Open 2024 Final : चिराग-सात्विक जेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंगलं, चीनच्या जोडीकडून थोडक्यात पराभव

Jan 14, 2024 06:28 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • मलेशिया ओपन २०२४ मधील पुरूष दुहेरीच्या फायनलमध्ये भारतीय जोडी सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पराभव झाला आहे. चीनची जोडी वांग चांग आणि लियांग वेईकांग भारतीय जोडीचा २१-९, १८-२१, १७-२१ असा पराभव केला.

भारतीय पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मलेशिया ओपन २०२४ च्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताचा सामना चीनच्या वांग चांग आणि लियांग वेईकेंग यांच्याशी झाला. या सामन्यात भारताचा २१-९, १८-२१, १७-२१ अशा फरकाने पराभव झाला. नुकताच खेलरत्नने सन्मानित झालेल्या सात्विक-चिरागचे मोसमातील पहिली स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

फायनलमध्ये भारतीय जोडीने पहिला गेम सहज जिंकला. सात्विक-चिराग यांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि पहिला गेम २१-९ अशा फरकाने जिंकला. मात्र, चीनच्या जोडीने दुसरा आणि तिसरा गेम जिंकून विजेतेपद पटकावले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

दुसऱ्या गेममध्ये चीनच्या जोडीने ८-३ अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीला येथून पुनरागमन करणे कठीण होते. पण, सात्विक-चिरागने पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि स्कोअर १९-१६ पर्यंत नेला. शेवटी, चिनी जोडीने २१-१८ अशा फरकाने गेम जिंकला आणि सामना तिसऱ्या फेरीत नेला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

तिसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने चांगली सुरुवात करत ६-२ अशी आघाडी घेतली. अर्ध्या गेमअखेर ११-७ अशी आघाडी होती. यानंतर चीनच्या जोडीने पुनरागमन करत स्कोअर १२-१२ असा केला. चीनच्या जोडीने चमकदार खेळ करत स्कोअर २१-१८ असा आपल्या नावे केला आणि चॅम्पियन बनले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सात्विक आणि चिराग ही भारताची सर्वात यशस्वी जोडी आहे. या जोडीने गेल्या काही वर्षात भारतासाठी धमाकेदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आशियाई गेम्स, आशियाई चॅम्पियनशिप, इंडोनेशियन सुपर १०००, कोरिया सुपर ५०० आणि स्विस ओपन सुपर ३०० मध्ये सुवर्णपदकं पटकावली आहेत. तसेच, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडीने चायना मास्टर्स सुपर ७५० ची अंतिम फेरी गाठली होती. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सात्विक आणि चिराग ही भारताची सर्वात यशस्वी जोडी आहे. या जोडीने गेल्या काही वर्षात भारतासाठी धमाकेदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आशियाई गेम्स, आशियाई चॅम्पियनशिप, इंडोनेशियन सुपर १०००, कोरिया सुपर ५०० आणि स्विस ओपन सुपर ३०० मध्ये सुवर्णपदकं पटकावली आहेत. तसेच, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडीने चायना मास्टर्स सुपर ७५० ची अंतिम फेरी गाठली होती. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज