बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरु असतानाच मलायकाने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मलायका आपल्या मैत्रिणींसोबत परदेशात फिरायला गेली असल्याचे दिसत आहे. तसेच तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मलायकाने हे फोटो शेअर करत आय लव्ह फ्रान्स असे लिहिले आहे. त्यामुळे ती फ्रान्सला फिरायला गेल्याचे म्हटले जात आहे.