सोमवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने १२ लाखांहून अधिक भाविकांनी प्रयागराज येथील तीन नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान केले.
(ANI)प्रयागराजमधील संगम घाटावर वार्षिक 'माघ मेळा' दरम्यान 'मकर संक्रांती' निमित्त गंगा नदीत पवित्र स्नान करताना भाविक. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्सवासाठी राज्यभर व्यापक व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.
(PTI)माघ मेळा अधिकारी दयानंद प्रसाद म्हणाले की, दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे १२.५० लाख भाविकांनी गंगा नदीत स्नान केले.
(REUTERS)येथील पुजारी राजेंद्र मिश्रा म्हणाले की काल रात्री उशिरापासून भाविक संगमावर स्नान करण्यासाठी येऊ लागले होते.
(PTI)एका भविकाणे कपाळावर "राम" हा शब्द लिहून मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगा नदीत पवित्र स्नान केले.
(REUTERS)