मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Accident : पुण्यात भयंकर अपघात, ३० ते ४० वाहनांची एकमेकांना धडक, पाहा घटनास्थळावरील भीषण PHOTO

Pune Accident : पुण्यात भयंकर अपघात, ३० ते ४० वाहनांची एकमेकांना धडक, पाहा घटनास्थळावरील भीषण PHOTO

Nov 20, 2022 11:10 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात असून या विचित्र अपघातामध्ये तब्बल ४८ वाहने समाविष्ट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातामुळे सातारा ते पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

आंध्र प्रदेशातून आलेल्या एका टँकरने साताऱ्याहून पुण्याकडे जाताना समोरच्या ३० ते ४० वाहनांना जोरदार धडक. ही घटना आज (रविवारी) रात्री साडे-आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अनेक वाहने एकमेकांना धडकल्याने घटनास्थळी सर्वत्र ऑईल सांडल्याने वाहने स्लीप होत आहेत. रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

या अपघातात ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पीएमआरडीए अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान १० जखमींवर शासकीय रुग्णवाहिका १०८ मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काही जखमीवर नवले पुलाजवळील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पोलिसांनी मोटारीत अडकलेल्या चालकासह प्रवाशांना बाहेर काढले. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातात ४८ वाहनांचे नुकसान झाले असून ३० ते ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे अग्निशमन दलाने दिली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

नवले पुलाजवळील तीव्र उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकरने पाठीमागून अनेक वाहनांना धडक दिली. टँकरची पाठीमागून धडक बसल्याने वाहने एकमेकांवर आदळली. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

नवले पुलाजवळील तीव्र उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकरने पाठीमागून अनेक वाहनांना धडक दिली. टँकरची पाठीमागून धडक बसल्याने वाहने एकमेकांवर आदळली. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज