Bigg boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. यापूर्वी अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले होते. आता यावर महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महेश मांजरेकर यांनी नुकताच अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांना, 'बिग बॉस मराठी ५ तुम्ही का होस्ट करत नाहीत' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले.
'ज्या वेळी मी बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा फक्त एक वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट होते. होस्ट करायच्या आधी मी कधीही बिग बॉस पाहिले नव्हते. मला नेहमी वाटायचे हे काय बघणार.. पण नंतर होस्ट करायला लागल्यावर मी बिग बॉस पाहायला लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की हा खूपच इंटरेस्टिंग खेळ आहे. मग त्यानंचर एक, दोन, तीन, चार सिझन मी केले' असे महेश मांजरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, 'पाचव्या सिझनच्या वेळी त्यांना वाटले की मी रिपिट होतोय. तसेच त्यांना जे हवय ते माझ्यात काही तरी कमी असेल. जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मला वाटलं होतं की मी का? कारण इतरही स्टार्स होते. आज रितेशचे नाव ऐकले तेव्हा मला बरे वाटले. मी क्या बात है असे म्हटलो. नशीब त्यांनी पहिल्या सिझनला रितेशला नाही घेतले. तसे झाले असते तर मी पहिला सिझनही केला नसता मग. चार वर्षे खूप मजा केली. आजही मी बिग बॉस आधीसारखा आनंदाने पाहातो.'