Maha Vikas Aaghadi Sabha Sambhaji Nagar : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षांची पहिली संयुक्त सभा (वज्रमुठ) सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभेला उपस्थित होते.
(Shiv Sena (UBT))Maha Vikas Aaghadi Sabha : मविआच्या वज्रमुठ सभेत बोलताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या १८० जागांवर विजयाचा दावा केला आहे. त्यामुळं संभाजीनगरमधील सभेतून मविआनं विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.
(Shiv Sena (UBT))माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
(Shiv Sena (UBT))छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहापैकी पाच आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: संभाजीनगरच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आता ठाकरे आणि शिंदे गटासाठी संभाजीनगर आणि मराठवाड्याची लढाई ही वर्चस्व आणि आस्तित्वाची झाली आहे.
(Shiv Sena (UBT))शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जंगी सभा व्हायच्या. याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार रणशिंग फुकलं आहे.
(Shiv Sena (UBT))राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे हे स्थानिक नेते पहिल्यांदाच मविआच्या कार्यक्रमााठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
(Shiv Sena (UBT))संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.
(Shiv Sena (UBT))