हिंदू धर्मात महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते.
महाशिवरात्री २०२५ तिथी : चतुर्दशी तिथी प्रारंभ - २६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी, चतुर्दशी तिथी समाप्त - २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी. हिंदू दिनदर्शिकेनुसार, २०२५ चा महाशिवरात्री उत्सव बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या (देवी पार्वती, भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, नंदी) संपूर्ण कुटुंबाचे चित्र किंवा मूर्ती घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते.
पारद शिवलिंग : महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरी आणणे अत्यंत फळदायी मानले जाते. हे घरात ठेवल्यास महादेवाचा आशीर्वाद तर मिळतोच शिवाय वास्तुदोष, कालसर्प दोष आणि पितृदोष देखील दूर होतो. पारद शिवलिंगाला नियमितपणे जल आणि बेलपत्र अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
रुद्राक्ष :
महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. रुद्राक्ष हे स्वतः भगवान शंकराचे च रूप असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात परंपरेनुसार गंगाजल किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास अत्यंत शुभ फळ मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि यश येते.