Shiv Temples : मुंबईतीस ५ प्रसिद्ध ऐतिहासिक शिव मंदिर, यंदा महाशिवरात्रीला नक्की भेट द्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shiv Temples : मुंबईतीस ५ प्रसिद्ध ऐतिहासिक शिव मंदिर, यंदा महाशिवरात्रीला नक्की भेट द्या

Shiv Temples : मुंबईतीस ५ प्रसिद्ध ऐतिहासिक शिव मंदिर, यंदा महाशिवरात्रीला नक्की भेट द्या

Shiv Temples : मुंबईतीस ५ प्रसिद्ध ऐतिहासिक शिव मंदिर, यंदा महाशिवरात्रीला नक्की भेट द्या

Mar 06, 2024 03:53 PM IST
  • twitter
  • twitter
Shiv Temple In Mumbai : मुंबईत अनेक पुरातन वास्तू, मंदिरे आणि शिल्पाकृती आहेत. मुंबईत ऐतिहासिक शिव मंदिरेही आहेत. जाणून घ्या या मंदिराची खास वैशिष्ट्य आणि या महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घ्या.
यंदा वर्ष २०२४ मध्ये शुक्रवार ८ मार्चला महाशिवरात्री आहे. महादेव ही अशी देवता आहे जी भक्तांवर लवकर प्रसन्न होते असे सांगितले जाते. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सगळीकडे मोठ्या उत्साहात व आनंदात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सर्व शिवमंदिरात भाविकांची रीघ असते. जाणून घ्या मुंबईतील खास शिव मंदिराविषयी थोडक्यात माहिती.
twitterfacebook
share
(1 / 6)

श्री पिंपळेश्वर शिव मंदिरपिंपळेश्वर शिवमंदिर हे पंतनगर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. सध्या हे पिंपळेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. पण ऐतिहासिक संदर्भानुसार हे रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध होते. हे शंभर वर्ष जुने मंदिर असल्याचे येथील स्थानिक रहिवास्यांचे म्हणणे आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

वाळुकेश्वर मंदिराचा अनेक शतकांपूर्वीचा समृद्ध इतिहास आहे. वरळीतील वाळुकेश्वर मंदिर हे एक शांत आणि आध्यात्मिक मरुभूमी म्हणून उभे आहे. मंदिराच्या वास्तूमध्ये पारंपारिक हिंदू शैली आणि आधुनिक प्रभावांचे मिश्रण आहे. प्रवेशद्वाराजवळ आल्यावर भव्य नंदीची मूर्ती असून, मुख्य मंदिरात पूजनीय महादेवाची पिंड आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

बाबुलनाथ मंदिरबाबुलनाथ मंदिर हे मालाबार टेकडीवर स्थित एक ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराचे नाव बाबुलनाथ असण्यामागे अनेक कथा प्रसिद्ध आहेत. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या मंदिराचे नाव बाबुलनाथ असण्यामागे अनेक कथा आहेत.
twitterfacebook
share
(4 / 6)

अंबरनाथ मंदिरयुनिस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या २१८ कला-समृद्ध स्मारकांपैकी हे शिव मंदिर भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिरावरील शिलालेखात मंदिर १०६० मध्ये पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिलाहारकालीन काळातील असून ते ९६३ वर्षांच्या काळात बांधले गेले आहे. या मंदिरातील महादेवाला अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. यावरुनच शहराचे नाव अंबरनाथ पडले आहे. 
twitterfacebook
share
(5 / 6)

चक्रेश्वर महादेव मंदिरचक्रेश्वर महादेव मंदिर हे भगवान शंकराचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे पवित्र स्थान म्हणून प्रख्यात आहे, कारण असे सांगितले जाते की, येथे श्री स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या राममंदिराची प्रतिष्ठा केली आणि याच ठिकाणी सजीव समाधी घेतलेल्या शिष्याला आशीर्वाद दिला.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज