महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महादेवाच्या मंदिरात भाविकांची रीघ असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकराची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते. या दिवशी भोलेनाथाचे भक्त मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करतात. यावर्षी महाशिवरात्रीचे व्रत कधी पाळले जाणार आहे, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे नियम जाणून घेऊया.
पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ८ मार्च रोजी रात्री ९ वाजून ४७ मिनिटापासून सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी ९ मार्च रोजी सायंकाळी ६:१७ वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी, निशिथ काळात भगवान शिवाची पूजा केली जाते, म्हणून यावर्षी महाशिवरात्रीचा उपवास शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी केला जाणार आहे.
शुक्रवार ८ मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकरासमोर पूर्ण भक्तीभावाने व्रत करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी.
प्रथम भगवान शंकराची पंचामृताने विधीवत पूजा करावी, महादेाच्या पिंडीवर पंचामृताने स्नान घालावे.
महादेवाला बेलपत्र आणि धोतरा सर्वात प्रिय आहेत, म्हणून तीन बेलपत्र, भांग, धोतऱ्याची फुले, जायफळ, कमळाचे बी, फळ, गुड, गोड सुपारी, सौभाग्याच्या वस्तू आणि दक्षिणा अर्पण करावी.