एखादी भूमिका लक्षात घेऊन, कलाकाराला त्यानुसार तयार करणे हे महत्त्वाचं काम ही मेकअपवाली मंडळी करत असतात. सध्या असंच एक पात्र सोशल मीडियावर विशेष गाजताना दिसत आहे. आता त्या पात्राचं कौतुक होताना आता मेकअपमन दादांचंही कौतुक होत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
एखाद्या कलाकाराचं एखादं पात्र हे विशेष गाजतं. पडद्यावर एखादी भूमिका रंगवताना ही कलाकार मंडळी स्वतः जीव ओतून काम करताना दिसतात आणि त्या मागची मेहनत मात्र फार कमी जणांना ठाऊक असते. मोठ्या पडद्यावर गाजलेलं एखादं पात्र अगदी हुबेहूब वाटावं यासाठी ही कलाकार मंडळी जीवतोड मेहनत करतात. आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात. अर्थात एखादी भूमिका साकारताना पात्र जशास तसं दिसावं म्हणून मेकअप दादांचा ही त्यात खारीचा वाटा असतो.
गौरवने त्याच्या विनोदी अंगानं नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली. या कार्यक्रमानंतर आता गौरव ‘मॅडनेस मचाऐंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमातून अल्पावधीतच गौरवने प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही गौरव बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच आता गौरवने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
गौरवने यावेळी ‘बाहुबली’ या सुप्रसिद्ध चित्रपटात मुख्य भूमिकांबरोबर खलनायकाची म्हणजे ‘कालकेय’ची गाजलेली भूमिका साकारली. ही भूमिका साकारताना तो अगदी हुबेहूब कालकेयच्या भूमिकेत शिरलेला पाहायला मिळाला. मात्र या भूमिकेसाठी त्याला मेकअप दादांनी अगदी हुबेहूब तयार केले असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे गौरवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत त्याचं व त्याच्या मेकअप दादांच कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे.