Maharashtra weather update : राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पुण्यात देखील आज ढगाळ हवामान राहून पावसाची शक्यता आहे. तर सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक येथे देखील थंडी वाढली आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
(1 / 6)
राज्यात राज्यात आज मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे थंडीचे प्रमाण देखील वाढणार आहे. (HT)
(2 / 6)
पुणे आणि परिसरात आज आकाश अंशता ढगाळ राहून आज आणि उद्या मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता आहे. १० तारखेला पावसाचे प्रमाण कमी होऊन ११ तारखेपासून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
(3 / 6)
पुण्यात किमान तापमानात हळूहळू ३ ते ४ डिग्री सेल्सियस पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ८ ते १० तारखेच्या सुमारास साधारण २ डिग्री सेल्सियस पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. पुढील ७२ तास पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. (HT)
(4 / 6)
मुंबईत तापमानात थोडी वाढ झाली आहे. तर वातावरण ढगाळ राहणार आहे. मुंबईत हलका ते अतिहलक्या पावसाचा अंदाज आहे.
(5 / 6)
नाशिक, आणि अहमदनगर जिल्ह्यात आज हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यात बुधवारी (दि ९) पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये पावसासह थंडी देखील वाढणार आहे. वातावरण ढगाळ राहणार असल्याने थंडी वाढणार आहे.
(6 / 6)
विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या बुधवारी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (HT)