ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वर्ष २०२३साठीच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२१ने ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांना गौरवण्यात आले.
स्वर्गीय राजकपूर जीवनगौरव पुरस्कार वर्ष २०२०ने ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन २०२२चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२२ मानकरी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे ठरले. त्यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.