मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maharashtra Monsoon : राज्यात वेळेआधीच धडकला पाऊस; हवामान विभागानं दिली खूषखबर

Maharashtra Monsoon : राज्यात वेळेआधीच धडकला पाऊस; हवामान विभागानं दिली खूषखबर

Jun 06, 2024 01:25 PM IST
  • twitter
  • twitter
  • Monsoon news update : गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी आनंद वार्ता आहे. राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णतेने नागरिकांना हैराण करून सोडले होते. पाऊस कधी पडणार याची वाट बळीराजासोबत सर्वसामान्य नागरिकांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. हवामान विभागाने मॉन्सून संदर्भात महत्वाची उपडेट दिली आहे. 
share
(1 / 7)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णतेने नागरिकांना हैराण करून सोडले होते. पाऊस कधी पडणार याची वाट बळीराजासोबत सर्वसामान्य नागरिकांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. हवामान विभागाने मॉन्सून संदर्भात महत्वाची उपडेट दिली आहे. 
आज ६ जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम व  त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. 
share
(2 / 7)
आज ६ जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम व  त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. (AP)
राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही जिल्ह्यात अजूनही तापमान हे ४० डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे. यामुळे पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मॉन्सूनचे आगमन झाले आहे.
share
(3 / 7)
राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही जिल्ह्यात अजूनही तापमान हे ४० डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे. यामुळे पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मॉन्सूनचे आगमन झाले आहे.(HT)
सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले आहे तर गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. 
share
(4 / 7)
सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले आहे तर गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. (HT)
राज्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी सुरू केली होती. खरीप पूर्व मशगतीची कामे देखील पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे आता पेरणीसाठी पावसाची वाट शेतकरी पाहत होते. राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी पूर्ण राज्य मॉन्सून व्यापला नाही. त्यामुळे पुर्व मौसमी पावसाच्या भरवशावर पेरणी टाळा असे हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सून पूर्णपणे राज्याला वेढण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. 
share
(5 / 7)
राज्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी सुरू केली होती. खरीप पूर्व मशगतीची कामे देखील पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे आता पेरणीसाठी पावसाची वाट शेतकरी पाहत होते. राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी पूर्ण राज्य मॉन्सून व्यापला नाही. त्यामुळे पुर्व मौसमी पावसाच्या भरवशावर पेरणी टाळा असे हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सून पूर्णपणे राज्याला वेढण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. 
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 
share
(6 / 7)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. (AP)
पुण्यात आणि मुंबईत गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. तर पुढील तीन दिवस पुण्यात आणि मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 
share
(7 / 7)
पुण्यात आणि मुंबईत गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. तर पुढील तीन दिवस पुण्यात आणि मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Yatish Lavania)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज