मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo Gallery  /  Maharashtra Kesari 2023 Shivraj Rakshe Sharad Pawar And Other Political Leader Appreciate Shivraj

Maharashtra kesari : शाब्बास रे पठ्ठ्या! शिवराजवर शरद पवारांसह राजकीय नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Jan 14, 2023 10:52 PM IST Shrikant Ashok Londhe

Maharashtra Kesari Shivraj Rakshe :  'महाराष्ट्र केसरी'ची गदा जिंकून शिवराज राक्षे याने आपले स्वप्न साकार केले आहे. या कामगिरीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. गेल्यावर्षी दुखापतीमुळे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यावेळीही तो विजेतेपदाचा दावेदार होता. ही कसर त्याने यावर्षी भरून काढली आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चितपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला. सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. 

(1 / 5)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राची गौरवशाली कुस्ती परंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीतली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. 

(2 / 5)

रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, शेतकरीपुत्र असलेल्या पै.शिवराज राक्षे याने यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. समोर भरभक्कम आवाहन असतानाही नेत्रदीपक कामगिरी करत शिवराजने हा विजय खेचून आणला आहे. महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे याचे मनापासून अभिनंदन! 

(3 / 5)

उदयनराजेंनी म्हटंल की, पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. महाराष्ट्र केसरी शिवराज व उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

(4 / 5)

धनंजय मुंडे व रोहित पवार यांनीही विजेत्या व उपविजेत्यांचे कौतुक केले आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की, शाब्बाज रे पठ्ठ्या.. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाच्या मदेवर आपलं नाव कोरल्याबद्दल मल्ल शिवराज राक्षे याचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर या स्पर्धेत चांगली लढत दिल्याबद्दल उप-महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याचंही अभिनंदन.

(5 / 5)

WhatsApp channel

इतर गॅलरीज