(1 / 3)पंकजा मुंडे: नागपूरच्या विधीमंडळात महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंकजा मुंडे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत सलग दोन टर्म आमदार होत्या. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना संधी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव केला. त्यानंतरही भाजपने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.