शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातून ३५ हजार ८३२ मतांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे जयकुमार गोरे यांनी माण विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे (शरद गट) प्रभाकर देवबा घार्गे यांच्यात लढत होती. जयकुमार यांना १ लाख ४८ हजार १९५ मत मिळाली असून त्यांनी प्रभाकर घार्गे यांचा ४९ हजार ६७५ मतांनी पराभव केला.
सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील विजयी झाले आहेत. मकरंद पाटील यांनी शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव झाला आहे. मकरंद पाटील यांना १ लाख ४० हजार ९७१ मते मिळाली. तर, अरुणादेवी पिसाळ यांना ७९ हजार ५७९ मतं मिळाली आहेत. मकरंद पाटील यांनी ६१ हजार ३९२ मतांनी विजय मिळवला.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यांना १ लाख ४२ हजार १२४ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.