राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा आज पासून (१ मार्च) सुरू झाली आहे.
(प्रफुल्ल गांगुर्डे)
यावर्षी संपूर्ण राज्यातून तब्बल १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या साठी राज्यातील ५३३ परीक्षा केंद्र तयार आहेत.
(प्रफुल्ल गांगुर्डे)यात ८ लाख ४४ हजार १६ ही मुले असून ७ लाख ३० हजार ६२ मुली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६१ हजार विद्यार्थी हे कमी बसले आहेत.
(प्रफुल्ल गांगुर्डे)विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचं आहे. हॉल तिकीटवर देखील टाईमटेबल नमूद केलेले आहे.