आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला आज पासून सुरुवात झाली.
संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात ३१९५ केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडणार आहे.
राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २१३९६ कर्मचारी कार्यरत असतील, २७१ भरारी पथके राज्यभरातील परीक्षा केंद्रावर ठेवणार लक्ष ठेवून असणार आहेत.
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात विद्यार्थ्यांची झडती देखील घेण्यात येणार आहे.