(1 / 5)राहुल गांधी यांची आज अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये सभा होती. सभेनंतर राहुल गांधी दिल्लीला रवाना होणार होते. नांदेडची सभा संपल्यानंतर दिल्ली असा राहुल गांधीचा नियोजित दौरा होता. मात्र सभा संपल्यानंतर राहुल गांधी यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता त्यांचा ताफा थेट नांदेडच्या बस स्थानकात गेला. इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी बसस्थानातील लोक व बसमधील प्रवाशांशी संवाद साधला. त्यानंतर तेथील रसवंती गृहात जाऊन ऊसाच्या रसाचा देखील आस्वाद घेतला.