(7 / 10)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजुर पक्ष (ILP) ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन या संस्थेची 18 जुलै 1942 रोजी स्थापना केली. 1956 मध्ये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ची स्थापना केली. तसेच त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा (1924), समता सैनिक दल (1927), स्वतंत्र मजूर पक्ष (द इंडिपेंडंट लेबर पार्टी )(1936), अनुसूचित जाती फेडरेशन (1942), द पीपल्स एज्युकेशन सोसायटी (1945), भारतीय बौद्ध महासभा (1950) अशा संस्था आणि संघटनांची उभारणी केली.