(1 / 5)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, शोषित, पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी आणि विरोधक, तसेच सरकारला धारेवर धरण्यासाठी वृत्तपत्राचा मार्ग अवलंबला. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर आपली समर्थ लेखणी चालवत समाजात क्रांती घडवायला सुरू केले.