Mahaparinirvan Din: बाबासाहेबांचे सत्याग्रह; अन्यायाविरुद्ध फुंकले रणशिंग, मिळवला न्याय!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mahaparinirvan Din: बाबासाहेबांचे सत्याग्रह; अन्यायाविरुद्ध फुंकले रणशिंग, मिळवला न्याय!

Mahaparinirvan Din: बाबासाहेबांचे सत्याग्रह; अन्यायाविरुद्ध फुंकले रणशिंग, मिळवला न्याय!

Mahaparinirvan Din: बाबासाहेबांचे सत्याग्रह; अन्यायाविरुद्ध फुंकले रणशिंग, मिळवला न्याय!

Dec 06, 2024 03:42 PM IST
  • twitter
  • twitter
Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली चळवळ नेहमीच अहिंसक मार्गाने चालवली. बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह करत तत्कालिन अस्पृश्य समाजात स्वाभिमानीची ज्योत पेटवली, त्यांना हक्क मिळवून दिले. तर, दुसरीकडे अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला हादरे दिले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्याग्रह –   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे संघर्षाची मालिका आहे. बाबासाहेबांनी अस्पृश्य, दलित, पीडित आणि शोषित समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक आंदोलने, सत्याग्रह केले. जाणून घेऊ या, त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या सत्याग्रहांविषयी…
twitterfacebook
share
(1 / 6)

चवदार तळे सत्याग्रह-  २० मार्च १९२७ मध्ये हा सत्याग्रह करण्यात आला. महाराष्ट्रातील महाड या शहरातील सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणांवर अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्याचा हक्क सांगण्याच्या उद्देशाने आंदोलन करण्यात आले. यालाच चवदार तळे सत्याग्रह असे म्हणतात.
twitterfacebook
share
(2 / 6)

मनुस्मृती दहन –  २५  डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे हा सत्याग्रह करण्यात आला. याचे स्वागताध्यक्ष दिपू संभाजी गायकवाड हे होते. यामध्ये काही सवर्ण समाजाचे लोकं उपस्थित होते – मडके बुवा (गणपत महादेव जाधव), बापूसाहेब गंगाधर सहस्रबुद्धे हे या सत्याग्रहात सहभागी झाले होते.
twitterfacebook
share
(3 / 6)

काळाराम मंदिर संत्याग्रह-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च  १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह करण्यात आला. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. हा सत्याग्रह ५ वर्षे चालला.
twitterfacebook
share
(4 / 6)

पर्वती मंदिर सत्याग्रह- पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते.पर्वती मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी पुण्यातील पर्वती मंदिरात अस्पृश्य जातींना प्रवेश देण्यासाठी आयोजित केलेला शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन होता. हा सत्याग्रह १३ ऑक्टोबर, १९२९ रोजी सुरू झाला होता. या सत्याग्रहात हजारों स्त्री-पुरुषांनी भाग घेतला होता. या सत्याग्रहात काहीच यश मिळाले नाही, मात्र मंदिराच्या आवारात दगडफेकीच्या काही घटना घडल्या.
twitterfacebook
share
(5 / 6)

अंबादेवी मंदिर सत्याग्रह- अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.
twitterfacebook
share
(6 / 6)

मुखेडचा पांडवप्रताप सत्याग्रह- मुखेडच्या या  सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. गोलमेज परिषदेच्या कामामुळे बाबासाहेब बराच काळ भारताबाहेर होते, त्यामुळे काळेराम मंदिरासह मुखेड सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेबांनी केले.
twitterfacebook
share
(7 / 6)

इतर गॅलरीज