(5 / 6)द पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि जागरूकता पसरवणे हे या संस्थचे उद्दीष्ट होते. या सोसायटीमार्फत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, मुंबई, मिलिंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, मुंबई, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई ही महाविद्यालये सुरू आहेत.